श्री मिल्या यांच्या सोडू नको या गझलेवरून ...
संपले मुद्दे तरी बोलायचे सोडू नको
चोरवाटेने प्रसंगी जायचे सोडू नको
मी तुला नक्की कधी लाटेन हे सांगू कसे ?
एवढे सांगेन की, 'मत द्यायचे सोडू नको'
मुकुटही घडतील आपोआप देवाच्या शिरी
तो भिकारी, तू भिकारी; घ्यायचे सोडू नको
काय हत्ती करिल ज्याचा हातही काटा असे..
कमळही भुंगा बनूनी खायचे सोडू नको
पाहिजे तर सांग गेलेल्या कुणाचा वंशही
पण जरासे सूतही लाटायचे सोडू नको
तू न पुतण्या, तू न भाचा; माहिती आहे मला..
बोल थोडेसेच.. पण बरळायचे सोडू नको
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
तू न पुतण्या तू न भाचा
प्रे. भूषण कटककर (शुक्र., ०८/०५/२००९ - १०:३९).
घ्यायचे सोडू नको..
प्रे. सतीश वाघमारे (रवि., १०/०५/२००९ - १८:०३).