मे
८
२००९
आमची प्रेरणा-
भूषण कटककर यांची छप्परतोड रचना- अगदी विचित्र सारे
अगदी विचित्र सारे देवा तुझे नजारे
कविता लिहायचे ते, का तोडतात तारे?
वाटेल का बरेसे कवितेस या ठिकाणी?
फोफावलेत जेथे वृत्तात कुंथणारे !
गतिरोधके कशाला नडतील सांग आम्हा?
अमुचे विमान आहे आकाश खोदणारे !
खुजली कशी निघाली लपवून ठेवलेली...
सर्वांसमक्ष आता ती खाजवून घ्या रे !
इतकेच जर कवीचे असतील शुद्ध हेतू,
का शोधतात भोके? हा ढुंकतात दारे?
प्रांती विडंबनाच्या आलाय 'खान' आता
फुटतील कल्पनांना आता नवे धुमारे !
+++++++++++++++++++++
(अवांतर- दुवा(लिंक) कसा देतात?)
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
हा हा हा
प्रे. केशवसुमार (शुक्र., ०८/०५/२००९ - १४:३९).
आकाश खोदणारे की फाडणारे?
प्रे. सुदर्शन कामत (शुक्र., ०८/०५/२००९ - १४:५१).
वा
प्रे. मिलिंद फणसे (शुक्र., ०८/०५/२००९ - १६:३०).
मजेशीर
प्रे. चक्रपाणि (शुक्र., ०८/०५/२००९ - १७:०२).
प्रांती विडंबनाच्या आलाय 'खान' आता
प्रे. फटाकडी (शनि., ०९/०५/२००९ - ११:२८).
अमुचे विमान आहे..
प्रे. सतीश वाघमारे (रवि., १०/०५/२००९ - १८:०७).