मे
८
२००९
आमची प्रेरणा जयंत५२ यांची सुरेख रचना फार आता फार झाले
भार झाले भार झाले
वजन अमुचे फार झाले
पेटले कविवर्य अमुचे
सर्व वाचक गार झाले
वाटते जालावरी या
घोर पापी फार झाले
पेग भरला एक आणिक
हे विमानी स्वार झाले
"ड्राय डे हा सफल झाला"
पण घरांचे बार झाले!
आमचा इतिहास आहे
'का बुटांचे हार' झाले!
काय केश्या, काय खोड्या
बघ कवी बेजार झाले
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
काय केश्या, काय खोड्या
प्रे. जयन्ता५२ (शुक्र., ०८/०५/२००९ - १९:५०).
हाहाहाहा
प्रे. चक्रपाणि (शुक्र., ०८/०५/२००९ - १९:५५).
सुरेख!
प्रे. संजय क्षीरसागर (शुक्र., ०८/०५/२००९ - २०:०३).
वा वा
प्रे. मिलिंद फणसे (शनि., ०९/०५/२००९ - ०२:०३).
उत्तम
प्रे. धोंडोपंत (शनि., ०९/०५/२००९ - ०५:४१).
पॉइंटात मुद्दा आहे तुमच्या
प्रे. इस्वास (शनि., ०९/०५/२००९ - ०६:१४).
एकदम झकास
प्रे. फटाकडी (शनि., ०९/०५/२००९ - ११:४७).
विडंबन
प्रे. भूषण कटककर (शनि., ०९/०५/२००९ - ०८:४०).
मस्तच
प्रे. कुमार जावडेकर (रवि., १०/०५/२००९ - १३:३३).
झकास !
प्रे. सतीश वाघमारे (रवि., १०/०५/२००९ - १८:२०).