फुगवून घे.

आमची प्रेरणा गझलकार  "ॐ" यांची गझल "जुळवून घे"

जे मिळाले ते गुमान गिळून घे,
गिळल्यावरी राजसा ताट पुसून घे.

ओळखीचे मला लाटणे हाताळणे,
राग तुझा फुकाचा आवरून घे.

का बसला असा तू रिकामटेकड्या?
घोंगडे पाण्यामध्ये भिजवून घे.

तोकड्याचे दुख: तुझे ना थांबते,
बाही हाताची कडेकडेने उसवून घे.

झाले वय तरी अजुनी यौवनात मी,
गाल खपाटीस गेले तुझे फुगवून घे.

या लोकशाहित गुंड, माकडाचा भरणा,
मर्कटबुद्धिने अंगठ्यास तू फितवून घे,

वाजणे फटाकडे तुझे गाजले पाहिजे,
पडणार सर्वांस भारी इथे तू उमजून घे.