मे
१६
२००९
मराठीतील पहिले विडंबक-द्वय, खो-के, सहर्ष सादर करीत आहे मराठी जालविश्वातील पहिले द्वंद्व-विडंबन ( की युगुल-विडंबन? ) - 'रगड'
मूळ जमीन : श्री. भूषण कटककरांची गझल दगड
पान या कादंबरीचे फाडुया
आपलेही ताव तिजला जोडुया
या विडंबन आज याचे पाडुया
आज थोडी खोड याची काढुया
घ्यायचा आहेच येथे फ्लॅ्ट तर
काय होते लोनचे ते पाहुया
दाद देण्यासारखे काही लिहो
आज ह्याने काय लिहिले पाहुया
वेळ झाली नेहमीची आपली
या, घसा ओला करूया, खाउया
कोण जाणे का असा लिहितो रगड
तोडतो तारे किती ते मोजुया
केस ती सोडेल तेव्हा सोडु दे
शेपटा तूर्तास आपण ओढुया
हेच ते जे चित्र पुर्वी बिघडले
आज मॉडर्न आर्ट त्या संबोधुया
केव्हढी घाई तुला खोक्या तरी?
आतला बाहेर येता जाउया!
- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
आभूषणास्पद!
प्रे. जयन्ता५२ (रवि., १७/०५/२००९ - ०७:५३).
खो-के ही नाइन्साफी आहे!
प्रे. संजय क्षीरसागर (रवि., १७/०५/२००९ - ०९:५६).
विडंबनांचा अतिरेक होत आहे असे वाटते बुवा
प्रे. आजानुकर्ण (रवि., १७/०५/२००९ - १३:०९).
सुसंबद्ध आणि सार्वजनिक
प्रे. टग्या (रवि., १७/०५/२००९ - १३:३७).
थोडेसे स्पष्टीकरण
प्रे. आजानुकर्ण (रवि., १७/०५/२००९ - १३:४५).
मतल्यातील जमीन
प्रे. भूषण कटककर (रवि., १७/०५/२००९ - १३:३९).
खोके तुमचे डोके
प्रे. फटाकडी (सोम., १८/०५/२००९ - ०५:५०).
हा हा हा!!
प्रे. केशवसुमार (सोम., १८/०५/२००९ - ०८:२६).
छान ......... .....
प्रे. सुधीर कांदळकर (बुध., २०/०५/२००९ - १६:१५).
वेळ झाली नेहमीची...
प्रे. सतीश वाघमारे (बुध., २०/०५/२००९ - १८:१२).