नोव्हेंबर
२
२००९
अर्पणपत्रिकाः मल्लिके, तुझ्यामुळेच हे लेखन शक्य झाले.
मूळ गीताचा दुवा -दुवा क्र. १
मनातल्या मनात मी तुझ्यासमीप राहतो
तुला न सांगता तुझा बराच देह पाहतो
अशीच रोज न्हाऊनी
लपेट वस्त्र एक ते
दरेक अंग आपले
उन्हात ठेव मोकळे
तशा स्थितीतल्या तुला बघून जीव रंगतो
मनातल्या नभांगणी
लवून थांब तू मुली
झकास अंतरंग तू
मलाच दाव आपुले
सदैव पाहण्यास मी तुला टपून राहतो
अजून जर तुला न ठाव
प्रसिध्द व्हायच्या परी
बये, विचार जाणत्या
महेश भट्टला तरी
समीप येऊनी तुझा मरंद तोच चाखतो
तसा न राहिला अता
मनात चोरटेपणा
तुझाच चित्रपट सदा
किती किती करी खुणा
पहा कसा रिमोटही तुझ्यामुळे सळाळतो
यंदाच्या मनोगत दिवाळी अंकासाठी आपले उत्तमोत्तम लेखन पाठवणार आहात ना?- प्रतिसाद लिहिण्यासाठी येण्याची नोंद किंवा नावनोंदणी करावी.
अरेच्चा..
प्रे. केदार पाटणकर (गुरु., ०५/११/२००९ - ०७:४७).
मल्लिकेतील रस
प्रे. केदार पाटणकर (गुरु., ०५/११/२००९ - ०७:४४).
कालबाह्य?
प्रे. केदार पाटणकर (बुध., २४/०२/२०१० - ०८:१४).
व्वा...
प्रे. कैलास गायकवाड (सोम., १९/०४/२०१० - १४:१९).
