एक अभंग

( आमची प्रेरणा .. नको देवराया अंत आता पाहू .... आणि संदर्भ  विडंबन विषयक नवीन धोरण   ...
   कोणावरही सरळ टीका करण्याच हेतू नाही , दुखावले गेल्यास माफी करावी )

नको खोडसाळा,  खोड्या अति करू
प्रशासक आता , कोपले आहेत

कोंबडीचे मस्त,  बटर चिकन झाले
तैसे तुवा केले, कवितांचे ह्या

तुज पुढे कोणी,  इथे ना टिकती
सारेच रडती, खोडाबाई

वैतागुनी खास,  कवी हे उदास
घेती प्रशासकास , कोपच्यात !!

------------------संत  'खोड'दास .

( अवघड शब्दांचे अर्थ : कोपच्यात घेणे - भीती दाखवून  किन्व्व गोड बोलून काम करून घेण्या साठी कोपरऱ्यात घेवून चर्चा करणे )