चेरी केक- प्रकार २

  • १२५ ग्राम बटर
  • १५० ग्राम साखर
  • ४ अंडी
  • २५० ग्राम मैदा+ १ चिमूट मीठ
  • २.५ चमचे बेकिंग पावडर
  • १/४ कप ऍपल किवा ऑरेंज ज्यूस
  • १ चमचा लिंबाचा रस + १ चमचा लिंबाची सालं किसून
  • ५०० ग्राम बरणीतल्या /टीन मधल्या पाकातल्या लाल चेरी
  • (ह्या चेरी आंबटगोड असतात म्हणून फ्लेवरला वॅनिला किवा तत्सम कोणताही इसेन्स न घालता लिंबाचा रस+सालं घाला,
  • व जर लिंबाचा इसेन्स मिळाला तर तो १/२ चमचा घाला.)
दीड तास
१६ तुकडे

पाकातल्या चेरी चाळणीवर टाकून पाक निथळत ठेवा.
बटर चांगले फेटा, त्यात साखर मिसळा आणि परत फेटा. अंडी फोडून त्यात घाला व फेटा. लिंबाचा रस व किसलेली सालं घाला, लेमन इसेन्स असेल तर तो घाला.
मैदा + बेकिंग पावडर+ चिमूटभर मीठ एकत्र करा व ते वरील मिश्रणात थोडे, थोडे घाला व फेटा. मिश्रण एकजीव झाले की संत्रा किवा अॅपल ज्यूस घाला.
केक मोल्ड ला बटर लावा, त्यावर वरील मिश्रणातल्या निम्म्यापेक्षा थोडे जास्त मिश्रण घाला. त्या मिश्रणावर चेरीज पसरून घाला व उरलेले मिश्रण घालून चेरी झाकून टाका.
१७० अंश से ला प्रिहिटेड अवन मध्ये ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
नेहमीप्रमाणेच- केक झाला की नाही ते विणायची सुई किवा सुरी खुपसून पाहा. मिश्रण न चिकटता सुई/सुरी बाहेर आली म्हणजे केक झाला.
अवनचे दार उघडून केक तेथे तसाच ५ मिनिटे राहू द्या.
नंतर बाहेर काढून अजून ५ मिनिटे तसाच ठेवा. आणि त्यानंतर जाळीवर काढून पूर्ण गार होऊ द्या.
पिठीसाखरेने सुशोभित करा.

चेरी केक अनेक प्रकारांनी बनवता येतो त्यापैकी  हा चेरी केक तुम्हाला माहित आहेच:- दुवा क्र. १

चेरी केक- प्रकार २