जून २२ २०१२

( फार झाले)

धोंडोपंत आपटे यांच्या फेसबुकवरील  सुंदर गजलेचे जरासे गंभीर विडंबन

आग भर दिवसात म्हणजे फार झाले
येत ना काबूत म्हणजे फार झाले

काय झाले हे असे साऱ्यास टाऊक
फाईली जळतात म्हणजे फार झाले

शाहणी जनता कधी होणार आता
मोजती मूर्खात म्हणजे फार झाले

भ्रष्ट हे सारे जरी नेते तरीही
निवडुनी येतात म्हणजे फार झाले

बोलण्याची स्पष्ट हे नाही मुभा अन
ह्या प्रथा छळतात म्हणजे फार झाले

चौकशी होईल ही दुनिये समोरी
सत्य गुलदस्त्यात म्हणजे फार झाले

देश हा आतून "केश्या" पेटलेला
ते तरी तोऱ्यात म्हणजे फार झाले"

--- केशवसुमार

Post to Feed

जबरदस्त
व्वा
मस्त!
आवडले
छान
आवडले
टाउक, शाहणी

Typing help hide