कताई शास्त्र ३

जिनिंग
मध्ये कापसाच्या बोंडातील सरकी तंतूपासून विलग केली जाते. साधारणपणे १००
किलो कपाशी मध्ये ६६ किलो सरकी व ३३ किलो रुई मिळते. १ टक्का घट असते.
सरकीचा वापर तेल व पशुखाद्य निर्मितीसाठी होतो.
.
भारतात नाईफ रोलर जीन जास्त प्रचलित आहे. यामध्ये कापसाच्या तंतूंची खराबी ( fibre rupture) कमी होते.
कापसाला घनता कमी असल्याने त्याचे आकारमान जास्त असते. सबब त्याच्या सुलभ वाहतुकी साठी रुईला दाब देऊन त्याची गाठ बनविली जाते

(pressing). अशा रीतीने बनविलेली एक गाठ/ गासडी/(bale) अंदाजे १६०-१७० किलो भरते.
भारतात अजूनही कापूस बाजारात कापूस खंडीच्या (candy) भावाने विकला जातो.( एक खंडी म्हणजे ३५६ किलो.)
सध्या मध्यम प्रतीचा कापूस ३६ ते ४० हजार रुपये प्रती खंडी आहे.
कपाशीच्या उत्पादनात भारत, पाकिस्तान, तुर्कस्तान, इजिप्त, सुदान, ऑस्ट्रेलिया, कझाकिस्तान, ब्राझिल, चीन हे देश अग्रेसर आहेत.
भारतातून दरवर्षी ८० लाखावर गासड्यांची निर्यात केली जाते, तसेच सुत, कापड, व तयार कपड्यांचीही निर्यात होते.
वस्त्रोद्योग हा देशातील शेती खालोखाल सर्वात मोठा रोजगार देणारा उद्योग आहे.

यानंतर कापूस कताई मिल मध्ये आणला जातो. सुत गिरण्यांचा कच्चा माल म्हणजे रुई गाठी.

रुई गाठी खरेदी करण्या आधीच कापसाचे प्रयोगशाळेत परीक्षण होते. आज काल
अत्याधुनिक हाय व्हॉल्यूम इन्स्ट्रुमेंट (HVI) द्वारे कापसाच्या
लांबी, परिपक्वता, तलमता, रंगाची प्रत, बल,Rd ,+b यांचे परीक्षण केवळ १/२ तासात होऊ शकते.
नंतर उत्पादनाच्या गरजेनुसार रुई गाठी खरेदी केल्या जातात.

आता आपण प्रत्यक्ष सुत निर्मितीकडे वळू.
क्रमशः