जून १५ २०१९

तुला पाहते रे........(विडंबन)

तुला पाहते रे,तुला पाहते
जरी बाटली मी तुला पाहते ......(ध्रुपद)

पडताचि तुजला धरी ना कुणी रे
तुझ्या संगतीला न येई कुणी रे
तुला लोळण्या सौख्य वाटे गटारी
घाणीची परवा नको तू करू रे.......(ध्रु)

तुझे रंग ढंग किती दिसताती
तुझे शिव्याशाप न कुणा लागताती
तुझ्या अंतरीची मदिरा वदे रे
तुला सर्व अंदाज येती कसे रे ......(ध्रु )

चखणा हवा की स्टार्टर हवे रे
तुझे ऐकण्या हा वेटर उभा रे 
तुझ्या जवळिचा अर्थ पाहूनि घे रे
उगा बाउन्सरा चान्स देऊ नको रे.....(ध्री) 

ग्रुहप्रवेश होता लाथ का बसेरे
समजुनियाहि सगळे सोडूनि दे रे
तुझी बायको कष्ट केवढे करे रे
दया। नयेई तुला का कधी रे..।.।(ध्रु )

खोटीच दुनिया मांडलीस सारी
खोट्याच दुनियेतिल खोटी झिंग भारी
सायखा रिता होत जातोसी तू रे
घरी कच्ची बच्ची वाट पाहती तुझी रे......(ध्रु)

सोडुनि देई मजला त्वरेने
बर्बद रस्त्यास टाटा करी रे
संसार तुझा सांभाळी तू रे
सुखी होऊनी भाग्य आणि घरी रे......(ध्रु)


। 

Post to Feed

मस्त
तुला पाहते रे,

Typing help hide