सेलफोनचा सह-वास!

(टीप : ह्या गोष्टीतील सर्व पात्रे, प्रसंग, ठिकाणे, वस्तू, विचार, तत्त्वज्ञान इत्यादी सर्वकाही पूर्णपणे काल्पनिक आहे. कशाचेही कशाशीही काहीही साम्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा, ही विनंती.)


आनूज आणि हर्शीला (हो, त्यांची नांवे अशीच आहेत.) नुकतेच लग्न होऊन अमेरिकेत आले, तेंव्हा त्यांच्याकडे सेलफोन नव्हते. ते सुरवातीला आणखी एका देशबांधव कुटुंबाबरोबर बाहेर जात असत. कधी ह्यांच्या तर कधी त्यांच्या गाडीतून. असेच एकदा ग्रोसरी आणायला गेले असताना, सासऱ्यांच्या पुजेला फुले लागतात म्हणून त्या कुटुंबातली ती फुलांचा गुच्छ उचलणार तोच मोबाईल वर तिच्या नवऱ्याचा मेसेज आला. इकडच्या फुलांचा भाव विचारून तो देशबांधव म्हणाला, "ते नको. त्यापेक्षा, इथेबागेच्या सामानात फुले असलेल्या कुंड्या आहेत. डर्ट चीप पडेल!"


ही त्या कुटुंबाची सोय पाहताच आनूज-हर्शीलाला सेल फोनचे महत्त्व पटले आणि त्यांनी लगेचच सेलफोन घेतले.


आता सेलफोनशिवाय त्यांचे जीवन हे कल्पनेपलीकडचे आहे. दोघांचे जॉब्ज शहराच्या दोन टोकांना. घरी येताना दोघे दोन वेगवेगळ्या स्टोअर मधे जातात आणि एकमेकांना सेल फोनवरून फोन करतात. पापड कुठे स्वस्त आहेत किंवा कुठे काही चांगले डील आहे का, ते पाहता येते. शिवाय नाग छाप हिंग की मोर छाप हेही एकमेकांना विचारून खातरजमा करून घेता येते. आता तर सेल फोनवरून फोटो पाठवता येत असल्याने ते एकमेकांना फोटो पाठवून कुठे लोणच्याच्या बाटलीतून तेल कमी गळते आहे, किंवा कुठे कणकेचे पाकीट कमी फाटले आहे, ह्याची खात्री करतात. सेलफोनशिवाय हे अशक्य आहे.


आनूजने मला हे सगळे जेंव्हा सांगितले त्यावेळी तो माझ्याशी सेलफोनवर फार उत्साहाने बोलला. (सेलफोनवर म्हणजे सेलफोनच्या विषयावर...माझ्याकडे सेल फोन नाही!)


"तुम्ही दोन वेगळ्या स्टोअर मधे जाता म्हणून ठीक आहे, पण एकाच स्टोअरमध्ये असताना सेलफोनचा काय उपयोग होणार?"


"अरे आम्ही एका स्टोर मधे असलो, आणि हर्शीला दोन रॅक पलीकडे असली तरी मला कॉल करते. वन ऍडव्हान्टेज की, आपण सेलफोनवर असलोम्हणजे जवळचे लोक उगीच काय कसं काय विचारत चिकटायला येतनाहीत. सेल फोन इजअ मस्ट. दीज डेज आम्ही तर डोअर बेल पणयूज करत नाही. त्याऐवजी फोन करून दार उघडायला सांगतो." तो मला म्हणाला..


"म्हणजे मग बील फार येत असेल" - मी.


"त्या त्या मंथमधे तुम्हाला तितकी मिनिट्स असतात बोला नाहीतर बोलू नका. त्यामुळे आम्ही ती बोलून कंझूम करतो."


"किती पैसे देतोस?"


"मी? नथ्थिंग!" .......... माझ्या तोंडाचा आश्चर्याने आ वासलेला पाहून तो पुढे म्हणाला, "हाः हाः हाःपैसे आपोआप तुमच्या कार्डातून डिडक्ट होतात महिन्याच्या महिन्याला. तुम्हालाकाही करायला नाही लागत त्यासाठी...ते सोड... ते आता जुनं झालं. हे बघ समथिंग अमेझिंग! "


"बापरे नवीन काय आता?"


"अरे आवाज पाठवता येतो, पिक्चर सेड करता येतं, दॅट वॉज ओके, पण आता ह्या नव्या ब्रँडच्या सेलफोनमधून वासही इकडून तिकडे पाठवता येतो!"


"काय सांगतोस!" मी ऐकून खलासच झालो.


"बऱ्याच वेळा दोन्ही स्टोर्स मध्ये डील चांगलेअसून पोळ्या किंवा सामोश्यांना वास कुठे कमी येतोय त्याची खात्री मात्र आम्हाला एकमेकांच्या अंदाजाने करावी लागायची. यू डोंट गेटद फील. हर्शीला तिकडून विचारणार, 'इज इटगुड?' की मग वास घेऊन मी सांगणार, 'आय मीन इट्स लाइक ओकेऽऽऽ लाइक' सेलफोन वरून डिस्कस करून त्यातल्या त्यात कमी वासाचे आयटेम्स असे डिसाइड करता येत होते, पण डायरेक्ट कंपेअर करता येत नव्हते. आता तो प्रॉब्लेम सुटला. आता वास डायरेक्ट कंपेअर करता येईल. यू कॅन ग्रॅब द बेस्ट!"


"वा! छान आहे आयडिया!... बोलणाऱ्याने नेहमी बोलताना फक्त तोंडात पेपरमिंट वगैरे धरलं म्हणजे काही प्रश्न नाही" मी विनोद करायचा प्रयत्न करीत म्हणालो.


"हाः हाः हाः गुड जोक!" आनूज लगेच मोठ्याने हसून विशाल मनाने म्हणाला. "पण दॅटइज ऑलरेडी थॉट ऑफ अँड इज व्हेरी सिंपल....तुम्हाला (म्हणजे आनूजला) ट्वेंटीफोर बाय सेव्हन कस्टमर सर्व्हिस द्यावी लागते, त्यामुळे मग तुम्ही किचनमधे असा नाहीतर टॉयलेटमध्ये, कॉन्फरन्स कॉल म्हणजे कॉन्फरन्स कॉल! दॅट टाइम, धिसस्मेल ऑप्शन, यू जस्टपुट ऑऽफ!" तो उत्साहाने म्हणाला.


"अमेझिंग!' मी मान्य केलं.आनूजच्या सहवासात मी बर्‍याच गोष्टी मान्य करतो. .. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.