मे ३० २००६

(गाफील)

येऊ घातलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने एका लातूरकरांचे चिंतन!!

राहू नयेच गाफील तो रिंगणात आहे
गोऱ्या महासूनेच्या तो वर्तुळात आहे !!१!!

का ज्ञात ना कुणाला याची तऱ्हा निराळी
दांडा कुऱ्हाडिचा हा गोतास काळ आहे !!२!!

मी खूश हो तिनाला हा चार सांगतो रे
नारायणामुळे या जीवास घोर आहे !!३!!

जिंकून चार सीटा खुर्चीस बळकवावे
हा अश्वमेध याच्या पुन्हा मनात आहे !!४!!

हासू नयेच कोणी या ठेंगण्या ठगाला
उंची अलीकडे त्या दिल्लीत फार आहे !!५!!

ठेवून प्रश्न मागे जावे 'विलास' कोठे
एका नव्या लढ्याची काळी प्रभात आहे !!६!!

 

लातूरकर खूपच चिंतेत असल्याने त्यांनी ऱ्हस्वदीर्घाचा आणि वृत्ताचा फारसा विचार केला नाही. मी पण त्यांच्या भावना मनोगतींपुढे पोहोचवणे महत्त्वाचे मानल्याने त्यांनी दिलेल्या खर्ड्यात बदल केला नाही. :) :) 

 


 

Post to Feed

छान
खर्डा की ठेचा ? :)
आवडले !
मस्त
हाहा
भले शाबास
सुंदर..
() का?
गोरी महासून

Typing help hide