पाऊस कोसळू दे



पाऊस कोसळू दे
उल्हास वर्दळू दे

मातीतुनी नभाला
रुजवून सळसळू दे

नुसते अता स्मितांनी
भवताल झळझळू दे

बोलू नकोस काही
एकांत दर्वळू दे

मज ओंजळीत घे, पण
थोडे उचंबळू दे!

जे बोललोच नाही,
तेही तुला कळू दे‍!

मी काय, कोण आहे?
मजलाच आकळू दे

            चित्तरंजन

 

ही रचना प्रतिसादपर आहे. आमचे प्रेरणास्थान