जुलै २१ २००६

तुम्ही मराठीसाठी काय करता ?

मराठीच्या सद्यःस्थितीबद्दल यथेच्छ टाहो फ़ोडून झाल्यावर आपण विचार करू की आपण मराठीसाठी काय करतो ? मी स्वतः खालील गोष्टी करतो.

१) ऑफ़िसमधल्या गणेशोत्सवात (ठार नास्तिक असूनही) झब्बा घालून, पुढे उभा राहून मोठ्या आवाजात "सुखकर्ता दुःखहर्ता" ही मराठी आरती म्हणतो.

२) ज्यांना मराठी समजतं त्यांच्याशी मराठीतच बोलतो.

३) संक्रांतीला मुद्दाम सगळ्यांना तिळगूळ वाटून "आमच्यात असं का असतं" हे समजावून सांगतो"

४) यंदा पालखी पुण्यात आल्यावर ट्रॅफ़िकच्या नावानी बोंब मारणाऱ्यांना ही लाखो लोकं कामंधामं सोडून पंढरपूरला का मरायला जातात हे सांगितलं.

५) शुक्रवारी ऑफ़िसच्या पार्टीमध्ये "माझा एकादशीचा उपास आहे" म्हणून काही खाल्लं नाही आणि का उपास आहे ते ही सांगितलं.

ह्या सगळ्यामगचा उद्देश एकच; मी मराठी आहे आणि "आमच्यात असं असतं" हे सगळ्यांना बोंब मारून सांगणे !

आपल्याला सगळ्यांनाच मराठीचा प्रचंड अभिमान आहे. मग तो "फ़्लाँट" का नाही करायचा? तुम्ही पण कुठेतरी, कसातरी हा अभिमान जपत असालच की. कसा तो सांगा पाहू !

Post to Feed

मी काय करते?
सकाळ
जमेल तेवढ सगळं करतोच...
सरकार मराठीसाठी काय करते ?
पहिले उघडून पहा...
बाय द वे ....
बाय दि वे
मराठी दर्पण
महाराष्ट्रात मराठीची गळचेपी कशी थांबवता येईल?
मराठी दर्पण छान आहे...
माझ्याही सुधारणा..
कोण थांबवू शकेल ?
प्लासी, पानिपत वगैरे..
अबबबब..
मराठीतून ब्लॉग
मराठी साठी शासकीय व्यक्तींनी काय करावे : वाचा
गंमतशीर
एका दिवसात पलटी
अकलेचे दिवाळे!
मल, मलमल वगैरे
सरकारच्या अकलेचे दिवाळे निघाले आहे ??
हा 'जो' कोण आहे?
जो आणि जे
जो कोण आहे?
जो
बरोबर
तितकेसे पटले नाही
कोऑर्डिनेटस = निर्देशक
आभार
सुविधा आवडली
कोऑर्डिनेटस
को-ऑर्डिनेटस = अक्ष-संदर्भ
काखेत कळसा आणि गावाला वळसा
हिंदीचा आग्रह होताच पाजळली मराठी वाघनखे
न्यायधीशांची परीक्षा आता मराठीतून
मी कय करतो..?
काय सांगता राव!
सहमत
तसं नाही..
'दिल्लीकरांच्या नाकावर टिच्चून'
मराठीसाठी कोणी काय-काय करावे..
मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद यापुढे फक्त मराठीतून!
नित्यशुद्धी
उपकरणे
मि काय कर तो?
नाव मात्र विंग्रजी
त्यांचे नाव
नाशिक जिल्हा न्यायालयात मराठी
मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई
काही नाही
अण्णा हजाऱ्यांचा मराठी लेख आणि मनोगत
संग्राहक यांस
संग्राहक यांस
डिस्नीची मराठी वाहिनी
हे 'मराठीसाठी काही करणे' कसे?
डिस्‍ने, डिज़्‍नी‌, की डिस्‍री ?
मी ४ मराठी मुलांना नोकरीला लावले.
माफ करा...
तुम्ही मराठीसाठी काय करता ?
कानडी
मराठीसाठी काय करावे?
मराठीचा उत्कर्ष कसा होईल?
एक प्रश्न
सोय आणि सक्ती
नाही
डॉक्टर आणि रोग्याची भाषा
खरोखर कळत नाही ?
डॉ. नागनाथ कोतापल्ले
मी मराठीसाठी पुढील काही केले आहे..
मराठी समालोचक बाळ पंडित कालवश
महाराष्ट्रातील केंद्रीय शाळांत मराठी बंधनकारक करणार
अवघड आहे.
भाषा आणि व्यवहार
समृद्धी आणि शाळेत शिकण्याची भाषा
पाचवीपर्यंत मातृभाषेतूनच शिकवा : सुब्रह्मण्यन समिती
मराठी बोलल्याने अपहरण टळले.
जे पी मॉर्गन नावाचा मराठी मानुस हा हा हा
अनागोंदीपासून वाचवा मराठी
सार
आता अमेरिकेत मराठी शिक्षणाची सोय
आता उत्तर प्रदेशात मराठी शिक्षण
काही मराठी (समाज)माध्यमिक शाळा!
महाराष्ट्रात मराठीचा वापर आता अनिवार्य
लिखित मराठीला १००० वर्षे पूर्ण ?
मराठी विद्यापीठाला मुहूर्त
मराठी वापरण्याचा शासकीय आदेश

Typing help hide