सप्टेंबर २००६

नामंजूर - २ : आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो

आताशा मी फक्त रकाने दिवसांचे भरतो
चाकोरीचे खरडून कागद सहीस पाठवतो

व्याप नको मज कुठलाही अन् ताप नको आहे
उत्तर कुठले? मुळात मजला प्रश्न नको आहे
ह्या प्रश्नांशी अवघ्या परवा करार मी केला
मी न छळावे त्यांना त्यांनी छळू नये मजला
बधीरतेच्या पुंगीवर मी नागोबा डुलतो

आता आता छाती केवळ भीती साठवते
डोंगर बघता उंची नाही खोली आठवते
आता कुठल्या दिलखुष गप्पा उदार गगनाशी
आता नाही रात्रही उरली पूर्वीगत हौशी
बिलंदरीने कलंदरीची गीते मी रचतो

कळून येता जगण्याची या इवलीशी त्रिज्या
उडून जाती अत्तरापरी जगण्याच्या मौजा
दारी नाही फिरकत कुठला नवा छंद चाळा
राखण करीत बसतो येथे सदैव कंटाळा
कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो

- संदीप खरे
संग्रह 'नामंजूर'

===

नामंजूर - १ : जपून किनारा शीड सोडणे नामंजूर

===

माझा विडंबनाचा प्रयत्न

मला हे गीत पूर्ण येते...

Typing help hide