लैंगिक शिक्षण

'लैंगिक शिक्षण'


मंडळी,


आपण जवळजवळ दररोज वर्तमानपत्रात बलात्काराविषयीच्या घटना पाहतो. यामागे बरीच कारणे असतील (दुसऱ्या एका चर्चेत सांगितल्याप्रमाणे दुवा )


तसेच समाजात अल्पवयीन 'वेश्यागमन', 'लैंगिक संबंध' चे प्रकारही आढळतात.


यामागे मला एकच ठळक कारण दिसते, ते म्हणजे 'लैंगिक शिक्षणा'चा अभाव !


मला याबद्दल बरेच प्रश्न पडतात -


१. आपल्या इथे 'सेक्स ही वाईट गोष्ट आहे' असे बरेच वेळा का पटवून दिले जाते? की आपल्या संस्कृतीत ही गोष्ट बसत नाही ?


२. सर्व पालक आपल्या 'पौगंडावस्थेतील' मुलांशी का मोकळे पणाने बोलत नाहीत ? जसे 'आई-मुलीला' एक 'मैत्रीण' आणि 'वडील-मुलाला' एक 'मित्र' या नात्याने.


३. किशोरावस्थेतील मुलांच्या काही प्रश्नांना  पालकांनी कसे उत्तर द्यायला पाहिजे ? जसे - 'माझा जन्म कसा झाला?', 'आई सेक्स म्हणजे काय गं?' 


४. सर्व शाळांत हा विषय इतर शालेय विषयांसारखा 'सक्तीचा' विषय म्हणून का नाही शिकवला जात ?  (काही शाळांत चालतो पण फारच अल्पप्रमाणात) याविषयावरील एखादे 'पाठ्यपुस्तक' का नाही ?


५. प्रसारमाध्यमांमुळे (दूरचित्रवाणी, मासिके इ.) किशोरावस्थेतील मुलांना 'सेक्स' विषयीची कितपत कल्पना मिळते ?  


६. जवळच्या मित्राकडून किंवा मैत्रिणीकडून मिळालेल्या अर्धवट माहितीमुळे त्यांच्या मनात न्यूनगंड येऊ शकत नाही काय ?  


७. मुलांसमोर किंवा सार्वजनिक ठिकाणी जोडपे प्रेम व्यक्त करायला का लाजतात ? (चुंबन घेणे इ. शिष्टाचाराला धरून) . परदेशात - विकसीत आणि मागासलेल्या देशांतील समाजात याला मान्यता आणि महत्त्व आहे. यातून आई-वडिलांचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे कळून मुलांना आपल्या कुटुंबाविषयी जिव्हाळा नाही का वाटणार ?


आपल्याला काय वाटत ? काय असतील या प्रश्नांची उत्तरे ?


आपल्याला नाही वाटत का 'लैंगिक शिक्षण' ही आपल्या समाजाची गरज निर्माण झाली आहे?


आपल्या सरकाराला, शिक्षण खात्याला, समाजातील डॉक्टरांना याबाबतीत काय करता येईल ?


आपल्याला याविषयी आणखीन प्रश्न असतील तर तेही मांडू शकता.


(मी मनोगतवर या विषयावरची चर्चा शोधण्याचा प्रयत्न केला पण अशी चर्चा आढळली नाही. असल्यास क्षमस्व. )


- मोरू