कवटाळलेस कारे ?

कवटाळलेस कारे ?
वर लाजतोस मारे !

गाउन दे सख्या मज
तू रेशमी नवा रे

तुज पाहताच येती
अंगावरी शहारे

उडवीत स्कर्ट माझा
आले उनाड वारे

रणचंडिकेस पाहुन
थंडावलास कारे ?

स्वैपाक कालचा तो
आंबून वास मारे

खेटून प्राण बसतो
लुब्रा असा कसा रे ?


आमची प्रेरणा - तुषार जोशी ह्यांची गझल तू टाळलेस कारे