सहज सरल सापेक्षता - ४

या आधी...





न्यूटन म्हणायचा,  "एक ताटली घ्या. त्यात थोडसं दुध घ्या. आता ताटली बोटावर धरून फिरवा. काय होतं? दूध कडेला सरकत सरकत बाहेर सांडतं." "त्यात काय विशेष?" हेच ना? अहो फिरण्यामुळं ओढ निर्माण होते, दूध बाहेर सांडतं. असंच ना? पण जर मी दूध 'स्थिर' होतं असं म्हणायचं ठरवलं तर?


याचाच अर्थ आकाश-तारे हे सारं फिरत आहे, आणी ही ताटली नि दूध 'स्थिर'. असंच ना? मग सांगू शकाल हे असं दूध बाहेर का सांडतं? अशा 'स्थिर' दुधाला बाहेर उडी मारायला भाग पाडलं तरी कुणी?


याच वेळी न्यूटन पुढं आला. म्हणाला, " होय. निरपेक्ष स्थिरता नसतेच. तुम्ही जेंव्हा जागा बदलता, तेंव्हा कुणी म्हणेल तुम्ही बदलता, कुणी म्हणेल नाही. ते ठीक ही आहे. पण या ओढीचं तर तसं नाही ना! ओढ आहे ही आहेच."


पण आईनस्टाइनचं मन घट्ट. त्याला पक्कं माहित होतं कि यात यापेक्षाही अधिक काहितरी दडलेलं आहे.  मी मग न्यूटनला म्हणालो, "आपण या जुन्या ओढी बरोबरच आणखी एक ओढ आणू!" (खरं तर सुरुवातीला त्यालाही ही कल्पना थोडी विचित्रच वाटली.) सरळ शब्दात सांगायचं तर.. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे ही नवी ओढ बरीचशी जुन्या ओढीसारखीच होती. 


आता असं करू, समजा, मी तुम्हाला एका खोक्यात बसवलं. आणि ते खोकं एका पोकळीत ठेवून दिलं. (इथं मला निरपेक्ष पोकळी अपेक्षित नाही बरं. थोडं बाकीच्या ओढीं पासून दूर राहिलं तरी पुरे आहे. हवं तर एखाद दोन तारे/तारका वगैरे घ्या सोबतीला. फारसे जवळ घेऊ नका म्हणजे झालं. ठीक?) आता समजा मी त्या खोक्याला एक दोर बांधला. त्याचं दुसरं टोक बांधलं एका गलबताला. मी त्या गलबतात बसलो नि सुसाट वेगाने पुढे सरकलो. वेग आणखी वाढवला. आणखी. आता जोवर मी तुम्ही सारख्याच दरानं वेग वाढवत आहात याची खबरदारी घेईन, तोवर तुम्हाला या इथे जशी ओढ जाणवते तशीच ओढ जाणवेल. जर तुमच्या कडं एक शिशाचा आणी एक लाकडाचा चेंडू असेल नि तुम्ही दोन्ही एकाच वेळी सोडले, तर ते एकाच वेळी खाली पडतील. थोडं विचित्र वाटतं ना? गोंधळलात?... आम्ही ही गोंधळलो होतो.


हे नक्की असं का होतं हे सांगायला कुणीच धजावत नव्हतं. निदान तोवर तरी. तो अल्बर्ट, त्यानं तो चेंडू उचलला नि सुटला पळंत. अगदी दिसेनासा झाला. सुरवातिला वर्षभर. नंतर मग आणखी दहा वर्षं. अहो खरंच! इतका वेळ! आणि खरं सांगायचं तर हे बागेत फेरफटका मारण्यासारखं मुळीच नव्हतं. आमच्या पैकी काही जण तर म्हणाले कि तो परतणारच नाही. पण जेंव्हा तो परत आला, तो म्हणाला, "ही जी नवी ओढ आपल्याला न्यूटननं दाखवली, ती खरं तर जुनीच आहे. 'तशीच' नव्हे, तीच आहे. या दोन्ही अगदी सारख्या आहेत.  मग तुमच्या लक्षात येईल की एक खरी अशी 'ओढ' असंतच नाही."


आलं का लक्षात तो काय म्हणाला? जेंव्हा तुम्ही त्या खोक्यात बंद होता, तुम्हाला नुसती 'घरच्या सारखी' ओढ भासत नव्हती, तर ही ओढ त्याच प्रकारची होती. आता जर तुम्ही म्हणालात, "आता जर त्या खोक्यालाच 'स्थिर' मानायचं ठरवलं तर? आता काय? आता ते चेंडू कशानं खाली पडले?" तर आइन्स्टाईन तुम्हाला म्हणेल, "ही जी पोकळी होती ना आजुबाजूला, तीच  एका ठराविक दरानं वेग वाढवत होती, ज्याची ओढ तुम्हाला नि तुमच्या खोक्याला जाणवली." तुम्ही म्हणाल, "ए, बस झालं हं आता. त्या पोकळीतलं वस्तुमान माझ्यावर अशी एखादी ओढ आणायला फाऽऽर दूर आहे." पुन्हा आइनस्टाईन म्हणेल, "नाहीच. तुम्हाला कळलंच नाही तर! त्या पोकळीत किती वस्तुमान आहे, याचा प्रश्न नाहीच मुळी! त्याचा पोकळीत वस्तुमान आहे, यातंच सारं आलं. तुम्ही नि तुमचं खोकं सोडून सारं काही."


तीच गोष्ट त्या दुधाची. तुम्ही म्हणालात, "ताटली स्थिर आहे", तर तो म्हणेल, "बाकी सारं (विश्व) फिरत आहे कि ज्यामुळं दुधाला ही ओढ आहे, ज्यानं ते बाहेर सांडतं."


थोडक्यात काय, न्यूटन म्हणाल कि तुम्ही एखाद्या वेळी स्थिर आहात की नाही हे नक्की सांगता येणं शक्य नाही. तुम्ही म्हणाल मी हालतोय, बाकी सारं स्थिर आहे काय, किंवा याच्या उलट काय. एकूण अर्थ एकच. पण आईनस्टाईन म्हणाला इतकंच नव्हे, तर तुम्हाला एखादी ओढ आहे, कि नाही हेही सांगता येणं अशक्य आहे. सरते शेवटी, तुम्ही कुढल्याही वेळी, कुठल्याही प्रकारे, 'स्थिर' असू शकत नाही. तुम्ही वर-खाली, इकडं तिकडं कशाही उड्या मारा हवं तर, पण तरी देखील तुम्ही स्वत:ला स्थिर म्हणवू शकताच.


ही आइनस्टाईनची मोठी झेप होती. आनंदानं त्यानं केवळ हवेत उडी मारायची शिल्लक ठेवली होती. त्याच्यासाठी ठीक होतं. पण आम्हाला आता त्याला कोडून ठेवावसं वाटत होतं. त्याचं म्हणणं होतंच असं विचित्र!


(क्रमश:)