बदलत्या संदर्भात परकी भाषांचे सांस्कृतिक योगदान/आडोसा

शाब्दिक रक्तपात   या चर्चेतील प्रभाकर पेठकर  यांच्या प्रतिक्रियेचा आधार घेत नवीन चर्चा विषयास आरंभ करण्याचा मनोदय आहे.


काही विशिष्ट शब्दांचा , कृतींचा उल्लेख माणसे टाळण्याचा प्रयत्न करतात,संकोचतात. हे करताना बऱ्याच शाब्दिक कसरतीही केल्या जातात.  'पार्श्व' शब्दाचा अर्थ बहुधा फक्त पृष्ठभाग होत असणार प्रभाकर पेठकरांनी तो वेगळ्या अर्थाने योजला . चाणक्याने शब्द टाळण्याची काळजी घेत अर्थ पोहचवलाच. अशीच सभ्य शाब्दिक कसरत करण्याची वेळ प्रत्येकावर येते ती म्हणजे टॉयलेट ला जातानाचा,  इतरांशी संवाद साधताना सतत वेगवेगळे शब्द वापरण्याची कसरत. साधा स्व भाषिय "शौच"  शब्द वापरावयाचे टाळून काय काय नावीन्यपूर्ण शब्द वापरण्याची कसरत सुरू असते. शक्यतो परभाषेचा आडोसा घेतला जातो.


परसाकडे-परस शब्द परिसर पासून आलेला ग्रामीण भागात पूर्वीचा अर्थ बगीचा असावा;आडोशाला- आडोसा म्हणजे  सहज न दिसणारा परिसर; टॉयलेट शब्द चक्क शौचालय सुचवतो पण तो परक्या भाषेत असल्यामुळे सुटसुटीत वाटतो,फक्त न्हाणीघर किंवा बाथरुम हे शब्द पण पर्यायी म्हणून वापरले जातात. आजकाल फक्त "फ्रेश" होणे हा शब्द वापरतात. मूळ अर्थ तोच.


सांगण्याचा मुख्य मुद्दा हा की प्रेम भावना व्यक्त करतानाही माणूस नकळत संकोचून परकीय भाषेचा आसरा घेतो काय? म्हणजे आधी हिंदी मग इंग्रजी मग इंग्रजी असालतर फ्रेंच असा आसरा -आडोसा पवित्र प्रेम भावना व्यक्त करताना सुद्धा का लागतो. रोमान्स तो रोमान्सच पण हिंदी आणि परभाषि चित्रपटातला पवित्र होतो. आमच्या लक्ष्मीकांत बेर्डेची,दादा कोडंकेची आम्हाला लाज वाटते हे योग्य आहे काय?


-पा.पा.