(रग)

आअची प्रेरणा येथे पहाता येईल

अकस्मात कोणा कवीने असे घसरू नये
कुठल्याही प्रकाशकाला गृहित धरू नये

तो खाईल तळून , वाढेल वजन जोमाने
हुमणावर *१ स्वत:हून लोणी पखरू नये

दगड लागती सारे, कधी इथे कधी तिथे
असू दे, म्हणून काय त्यांनी नेम धरू नये ?

नाल्यात बेडकांचा बघ सूर लागला
कूपात नांदताना असे कुरकुरू नये

झाले अशक्य आता माश्यांस वारणे
झाल्या विडंबनांचे गणित करू नये

वि. सू. या विडंबनाला काहीही अर्थ नाही असे खुद्ध माझेच मत आहे. चोखूच्या तोंडची वाक्ये पळवून (आता त्याच्या तोंडचे पाणीही पळणार बहुधा...) "काही जमले नाही बुवा!" असे मीच म्हणून टाकते. हा पदार्थ फसला(की फसफसला) असल्यामुळे प्रकाशित करावा की करू नये यावर बराच खल केल्यावर प्रकाशित करायचा निर्णय घेतला आहे.
*१ : हा उल्लेख फक्त ऐकीव माहितीवर आधारित असल्यामुळे पूर्णपणे चुकला असल्यास मला मारू नये ही विनंती
--अदिती