कुठे म्हणालो परी असावी - २

आमची प्रेरणा -  श्री. प्रणव सदाशिव काळे यांची गझल "कुठे म्हणालो परी असावी".

कुठे म्हणालो परी असावी
कधीतरी पण घरी असावी

हवी कुणाला छचोर मैना ?
वरायला छोकरी असावी

तरुस घरदार मानणारी
अशी कुणी वानरी असावी

नको अवाढव्य बॅंड-बाजा
फुकायला बासरी असावी

नकोय काकूसमान पण ती
जरा तरी लाजरी असावी

नकोत लुगडी जुनेर सूती
कधी तरी भरजरी असावी

उसळ नको अन् नको आमट्या  :(
खमंग मुर्गी करी असावी

नको "वहाव्वा", "सुरेख", "उत्तम"
विडंबनं बोचरी असावी

विदीर्ण झालास 'खोडसाळा'
तिची जिव्हा कातरी असावी