स्वीकारले-२

आमची प्रेरणा केदार पाटणकरांची सुरेख गझल स्वीकारले

मी कधी पैशास ना नाकारले
सर्व मार्गांनी तया स्वीकारले

मैत्रिणीवर जीव होता टाकला
पण तिनेही मला झिडकारले

लोक आता कुंचल्याने  मारती
(नग्न चित्रंना अधी मी साकारले)

खीर खाता वाढली साखर अशी
रोज आता जेवणाला  कारले 

"केशवा"च्या निर्लज्य या लेखना 
आज  सर्वांनी  पुन्हा धिक्कारले