आपले मुख्यमंत्री चांगल्या प्रशासनाची ग्वाही देत असले तरी आपल्या राज्यात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे.
मोबाईल व मोटरसायकलीन्मुळे त्यांचा वावर व प्रस्थ खूपच वाढले आहे व जणू कोणतीही गोष्ट अशक्य नसून सर्व कायदे किन्वा माणसे आपल्या हातात आहेत अशा थाटात ते वावरत असतात्ा. जरी त्यानी काय काय गोष्टी केल्या त्याचे पुरावे मिळत
नसले तरी त्यांच्या बोलण्यावरून ते खालील कामे करतातः
१)नळाची खोटे बीले कऱणे
२)मालमत्तेच्या कराची खोटे बीले करणे
३)बीले वाटेल त्या माणसाच्या नावाने करणे
४) झाडांच्या मालकी वाटेल त्या माणसाच्या नावाने करणे
५)खोटे हिशेब लावणे
६)एकाद्याच्या दारासमोर दुसर्याच्या गाडीची खोटी नोंद करणे
७)एकाद्याची गाडी दुसर्याची आहे असे खोटे सान्गणॅ
८)खोट्या लोनविषयी बोलणे
९)एकादा माणूस रहावयास येणार आहे असे खोटे सान्गणे.
१०)एकादी जागा खाली झाली आहे असे खोटे सान्गणे
११)एकाद्या खोलीत दुसर्याचे सामान(टेबल,पंखा वगैरे) आहे असे खोटे सान्गणे
१२) या सर्व गोष्टी मुद्दाम मोठ्याने घरासमोर बोलण्यास माणसे पाठवून घरमालकाना त्रास देणे