लागली कशी रं घूस - येक इडंबान

इडंबान - आम्चे फूर्थीस्तान - मा. बैरागी याणची कवीता - वाजला किती पाऊस

लागली कशी रं घूस।
लावला ऊस।
जवा माळ्यानी॥

लै बारीक हाय ह्यो बोळ।
घुशिवतो पोळ
गुराखी त्यात॥

देवळात कुनीबी भक्त।
मागतो फक्त।
भीक पैक्याची॥

डोळ्यात पडावं फूल।
तशी रं भूल।
येड्या ही हाये॥

माप जरा नीट लिवा।
ही चोळी शिवा।
जराशी सैल॥

दावतंया ताठा फार।
आत पेंढार।
दस नंबरी

१ - आदुगर प्वाळ - माजावर आल्याला बैल
२. - आदुगर - बुजगावणं