आज पुन्हा पावसाची संततधार आहे..
हृदयात पुन्हा त्याच आगीचा अंगार आहे...
काहीसे असेच दिवस होत, जेव्हा आमची भेट झाली होती
बगिच्यात नव्हे, तर हृदयात फ़ुले उमलली होती
आज तेच वातावरण आहे, मात्र ऋतू तो नाही
माझ्या बरोबर पावसाच्याही नयनांत अश्रुंची धार आहे..
आज पुन्हा पावसाची संततधार आहे..
हृदयात पुन्हा त्याच आगीचा अंगार आहे...
कुणीतरी हृदयावर जरा फुंकर घालावे
हृदयाच्या तुकड्यांना एकत्र जोडावे
पण या सर्व स्वप्नांतल्या आणि विचारांतल्या गोष्टी आहेत
भंग पावलेली गोष्ट का कुणी जोडणार आहे...
आज पुन्हा पावसाची संततधार आहे..
हृदयात पुन्हा त्याच आगीचा अंगार आहे...
हा अनुवाद कोणत्या हिंदी गाण्याचा आहे, ते ओळखा.
प्रशासकां ना विनंती आहे, की काही काळापर्यंत उत्तरे झाकून ठेवा. व्य. नि. तून उत्तरे पाठवल्यास चालतील.