वेळी अवेळी -२

आमची प्रेरणा जयंतरावांची गजल वेळी अवेळी

तू नको घेऊ अता वेळी अवेळी
तोल जातो,चालता वेळी अवेळी

हा खुळा नवरा विचारी बायकोला!
'चिंच कैऱ्या' मागता वेळी अवेळी?

योजना आहे तुला छेडावयाची
का अशी मग सभ्यता वेळी अवेळी

मी घरी येऊ कसा तू सांग,सखये
बाप तव हा जागता वेळी अवेळी

येव्हढे ही जाणशी ना "केशवा" तू
येत नाही सांगता वेळी अवेळी

(केशवसुमार६९)