आमची प्रेरणा मृण्मयी यांची सुरेख कविता भांडं
"...चर्चेत भांडावं लागायचंच,
त्यात काय मोठंसं?"
गुळगुळीत, क्लिशे बनलेले प्रतिसाद
बहुतेक क्लिशेंप्रमाणे
- काही प्रमाणात.
नसेलही त्यात काही मोठंसं
पण प्रत्येक वेळी भांडण हवंच
कधी लहान
कधी मोठं
कधी कायमचे
चर्चेचे स्वरूप बदलणारे,
चर्चा रंगवणार.
प्रतिसादांची संख्या वाढत जाते
अपरिहार्यपणे
आणि एक दिवशी चर्चेचा मूळ विषय
ओळखू येईनासा होतो
तरी ही हिंमत कर
नवं भांडण करण्याची...
नवी चर्चा घेण्याची...