सुनेचा गहिंवर

'१७ सप्टेंबर या दिवशी फ़क्त पहिली ओळ लिहिली.पूर्ण कविता आता लिहीत आहे.

परदेशांत खट्याळ नातवाला एकट्याने संभाळताना, माझ्या सुनेने गहिंवरून केलेल्या सूचनांची खालील कविता झाली

(कै.शांता शेळके याना वंदन करून)

ओटीत घातला मुलगा तुमच्या बाबा

दिनभरांत ठेवा तुम्ही मनावर ताबा---//धृ//

आजोबा तुम्ही,आम्हा आहे ठावुक

परि नकाच होवु, अती तुम्ही भावुक

अवखळ तो परि, करू नका तुम्ही त्रागा

दिनभरांत ठेवा-----------------------//१//

तो उठतां तुम्ही,त्यास "सिरियल" द्यावे

"सिंहासन"(*) सोडुन कुठे न त्यां बसवावे     (*) हाय चेअर

तो खाणॅ होउन नाही म्हणता थांबा

दिनभरांत ठेवा--------------------//२//

तो अवखळ मुलगा, त्यांस तुम्ही पळु द्यावे

त्याच्याही संगें "क्रिकेट" ते खेळावे

तो खेळ फेंकता शांतपणाने वागा

दिनभरांत ठेवा--------------------//३//

दिवसाची ती मग वेळ दहावरी जाये

वाचनालयासी तुम्ही त्यांस निट न्यावें

तो पळतानाही त्यांस तुम्ही आंवरावा

दिनभरांत ठेवा---------------------//४//

तुमची  न उडावी  नेताना जरि त्रेधा

सांभाळुनि त्याला नीट "गाडिसी"(*) बांधा      (*) स्ट्रोलर

असु द्यावी जवळी ,किल्लि घराची नीट

ना तरिही आम्हा ,उगे बसेलच खोट

मग त्र्याग्याने करु ,नका तुम्ही हो धावा

दिनभरात ठेवा----------------------//५//

लगबगिने मग तुम्हि,त्याचसवें घरि यावे

अन तयार भोजन गरम करुनि ठेवावे

त्या अन्नाचा मग, घांस त्यास हो भरवां

दिनभरांत ठेवा-----------------------//६//

चिडला जरि तो , क्रोध ना तुम्हिं करावा

जरि केला त्याने ,हट्ट "सी डी" चा बरवा

परि घट्ट मनाने त्यांस दूर हो सारा

दिनभरांत ठेवा---------------------//७//

त्या नंतर तुमची खरी परिक्षा  होई

बहु कष्टसाध्य ती त्यांस  झोप  जी येई

तो "आ आ " करतां, तुम्हीं "ऊ ऊ" करा

दिनभरांत ठेवा---------------------//८//

जरि असती बहु कष्टसाध्य या गोष्टी

परि तुम्ही  व्हांवे,नका मनांतुन कष्टी

अन थंडपणाने , करां ईश्वरी धांवा

दिनभरांत ठेवा-------------------//९//

सुन तुमची मी हो,खरेच नाही खाष्ट

परतेनही वेंळी,तुम्हां सांगते स्पष्ट

ही खात्री बाळग़ा ,वेळेवर परतेन

आणलेला मग मी ,"बियर क्यान " तो घ्यावा 

दिनभरांत ठेवा---------------------------//१०//

हप्त्यांतहि तुमची, दो दिसांचि हो सुट्टी

प्रिय पत्नीशी मग, जमेल तुमची गट्टी

यास्तव ही करि , विनंति तुम्हां बाबा`

दिनभरांत ठेवा तुम्ही मनावर ताबा------//११//