संसाराचा अर्थ कळेना सगळी प्यादी फसवी
नग्न मनाची रोज मशागत नवीन वस्त्रे नटवी
शुभ्र धुक्यातून चालत आलो पडसादाची हूल
धुके न सरले विरला ध्वनि पण गडद पडे ही भूल
तत्त्वांच्या सावल्या नाचती दिङमूढ पाहे नर
तत्त्व एकले संभोगाचे मादीवरती स्वार
अश्रूंच्या मृगजळात कावड बुडली सुप्रज्ञेची
सार्वभौम अधिराज्य गाजवी बाष्कळ आशा मनीची.
-- अभय अरुण इनामदार