ढगाळलेल्या नभात
सावळा शशी
चिमुकली चांदणी
दिसणार कशी?
वाऱ्याची खोडी
फुलांना आवडी
हळूच उमलतेय
जाईची कळी
रातकिड्याची कीरकीर
पानांची सळसळ
साऱ्या जगावर
झोपेची मरगळ
काळोख काळा
पावसात भिजला
ओल्या काळोखात
पाउस हरवला
हिरव्या गवतावर
थेंबांचे मोती
वेचुन बघा
हातातून निसटती
माझ्या मनावर
कैसी धुंदी
निसर्गाची ह्या
जादू समदी