खुज्या पाखराने नभाला नमावे
क्षितिजापुरेसे पंख पसरावे
ऊर भरूनीया घेऊनिया श्वास
फुलारून येई फुकाचा विश्वास
विकारभ्रमंती फेर धरीतसे
अता विवेकाला खुळे पिसे ग्रासे
भरारी मारण्या आकाश साधन
साध्य तेच वाटे तिथेच भ्रमण
गोल आवर्तने कितीक जाहली
यशाची ओंजळ कुठे हरवली?
पाखरू विचारी मनीच्या विवेका
किती ते भ्रमण कुठे माझी रेखा
शरीर थकले विवेक भ्रांतला
पुरेनात पंख श्वासही संपला!