फिरून येई संध्याकाळ...

फिरून येते संध्याकाळ...

फेकित अग्नी आला जेव्हा
सूर्य  दुपारी  माथ्यावरती
सुकून गेल्या फूलपाकळ्या
नवीन येई संध्याकाळ

कोमेजुन गेलेली पाने
गळून गेली अंगावरुनी
माघारी  झाड राहिले 
थकून येई संध्याकाळ

मनी सावळे मेघ दाटले
डोळ्यामधुनी झरती धारा
झाडाच्या फांद्या कुढणाऱ्या
भिजून येई संध्याकाळ....

क्षितिज गिळोनी रात्र संपली
मुळे उखडुनी पसार वादळ
धरणी एकाकी उरलेली
फिरून येई संध्याकाळ...