'वा वाह्' म्हणेन मी तर सोकावतील सारे

आमची प्रेरणा चक्रपाणी यांची सुंदर कविता 'चुकलो' म्हणेन मी तर सोकावतील सारे

'वा वाह्' म्हणेन मी तर सोकावतील सारे
कविताच ऐकवोनी भंडावतील सारे

ओढून ओढणीला जे काय लपवलेले
डोळे करून बारिक डोकावतील सारे

करमेत लाथ जेव्हा घालेल बायको ती
करतील काय दुसरे,थंडावतील सारे

सोडून लाज येथे गेले दलालखानी
बाज़ार भाव पाहून मंदावतील सारे

बदलून नाव अपुले प्रतिसाद टाकला तू
कळताच नाव "केश्या" तुज चावतील सारे

केशवसुमार