ललाटलेख!

लिहतांना
त्याच्या पेनातली शाई संपली असावी
म्हणून त्याने अर्धवटच ठेवला
माझा ललाटलेख!
आणि आता इथवर येऊन
मी 'पुढे काय?' वर थिजलेला-
१) त्याला विचारलं तर तो म्हणाला
  'आता, तुझं तूच काय ते ठरव!
२) लोकांना विचारलं तर ते म्हणाले
'आता, तू आणि तुझं नशीब(?)
आणि ३) ती तर म्हणाली की
तिचं नशीब तीनं माझ्या (नॉन-एक्झीस्टंट)
नशीबाशी बांधून टाकलय केंव्हाच!
मग मी
उरलेल्या श्वासांचं गाठोडं घेऊन
तसाच तिरीमिरीत चालत गेलो
क्षितीजापर्यंत
तर तिथेही आभाळ खरंच धरतीला 
टेकून पुढचे सगळे रस्ते बंद झालेले!
आणि मी
तिथेच उभा
श्वास उरलेले कलेवर घेऊन
वाट संपलेला पांथस्थ..!

जयन्ता५२