का मन हे धावत जाते...
क्षणभंगुर सुखाच्या मागे
'तो' निघून गेला... तरीही
पाऊलखुणांचे धागे !
का मन हे मागत जाते...
अजून... अजून... मज काही
'तो' निघून गेला... पूस तू
या पानावरची शाई !
का मन हे शोधत जाते...
'त्या' दूर... क्षितिजपल्याड
ही सरत चालली सांज
'तो' अजुनही नजरेआड !
रे मना ! भुलवू नको मज
ही... अधांतरीची वाट
'तो' निघून गेला... गेला...
अन सुटली... रेशीमगाठ !