हे न जिणे वांछिले, होते मी कधी
कोणास, न काही, मागीतले मी कधी ।
भोगले, भोग सारे, माझेच मी नेहमी
अश्रुंचे सर, न व्यर्थ, ओविले मी कधी ।
सोबतीने आले, सगे सोयरे माझे
राहीले जे मागे, न वळून पाहिले मी कधी ।
सुख-दुःख समान, धरिले मी चित्ती
शरणांगत न देवापुढती, झाले मी कधी ।
दो करांनी उधळले, सर्वस्व मी माझे
कोणाकडून, न दान कसले, घेतले मी कधी ।
हे न जिणे वांछिले, होते मी कधी
हे न जिणे वांछिले, होते मी कधी .....