...अश्रूच जिथे कोरडले

............................................

...अश्रूच जिथे कोरडले

............................................

...अश्रूच जिथे कोरडले
तेथे कोण किती रडले
वा मुकेपणी ओरडले
काय कळे...?

ही वेळ अशी का आली ?
कोणीच नसे भवताली
का सांज अचानक झाली ?
तिमिर छळे !

हे काय कळेना स्मरते ?
काळीज उगा हुरहुरते
कायमचे काही सरते
जीव जळे !

मी मौन कसे ओलांडू...?
हे दुःख कुठे मी मांडू...?
अन् कुणाकुणाशी भांडू...?
तोल ढळे !

चुकले का माझे इतके ?
मन कुठे करू मी हलके ?
का झाले आहे परके ?
जग सगळे...!

- प्रदीप कुलकर्णी

............................................

रचनाकाल ः ६ जुलै २००६

............................................