दिवाळी अंक २००७: भावलेल्या कविता (१)

यंदा २००७ च्या दिवाळीत वाचनात आलेल्या दिवाळी अंकामधील मला भावलेल्या कविता 'मनोगत'वर देत आहे व देत राहीन. तुम्हाला आवडलेल्या कविताही शीर्षकातील पुढील क्रमांक देऊन ही मालिका पुढे न्यावी ही विनंती.यंदाच्या काही दिवाळी अंकामधे कवितांना पूर्णपणे वगळण्यात आले आहे याची खंत वाटते.

खाली दिलेली कविता ही 'अक्षर' या दिवाळी अंकातली 'अस्मिता गुरव' यांची आहे.

अपराध
यापुढे देणारच नाही मी
संदर्भासहित स्पष्टीकरण
न केलेल्या अपराधांचं...
आरोपांच्या फैरीबद्दलही
मला काहीच म्हणायचं
नाहीये आता...
फक्त
नजर उचलून एकच सांग.
आपल्या नात्याची वीण
उसवतांना..
तुटत जाणाऱ्या मला
त्रयस्थासारखं पाहणं हा
तुझा गुन्हा नव्हता का?

---------------------------------------------------------------------------------------

(प्रेषकः जयन्ता५२)