खोट्या साऱ्या... आणाभाका-शपथा
खोटे सारे... हुडकणे... मी लपता ?
खोटे होते... डोळ्यामधले पाणी
खोटा का तो... राजा आणिक राणी ?
खोटी सारी... तुझी ती वाटपाहणी
खोटी होती.... गायचा जी गाणी ?
खोटी होती... पत्रे तू लिहिलेली
खोटी मैत्री... जिवापाड जपलेली ?
खोटे का रे... आठवणींचे जाळे
खोटे होते... शब्दफुलांचे पोळे ?
खोटे आता... तुझे नि माझे जगणे
खोटे आता... खोटे... खोटे हसणे.
.....................................
पण एक सांग तू... सखया जाता जाता
सोडून 'काळीज' का... पाय निघाले आता ?