माझी सखी माझी कविता

कविता माझी असे जरी माझ्यापुरती

कविता असे ही माझी प्रिय सखी

नसते कोणी जेव्हा आपले जवळ आणि सगळेच जेथे अनोळखी

येते तेव्हाच अचानक समोर माझी प्रिय सखी

रानावनातून विखुरलेले अन वाऱ्यावर हुंदडणारे

शब्द वेडे तिच्या चाहुलीने माझ्याभोवती जमतात

फेर धरून आठवनींचा रानोमाळी घुमतात असे

मात्र तिच्या एका हाकेने पुन्हा लयबद्ध होतात

देऊन जाते हलकेच तिच्या असण्याची जाणिव अशी

माळावर कोसळावी पावसाची सर अचानक जशी

त्या पावसाच्या प्रत्येक थेंबात तिला साठवताना

नव्या थेंबातून पुन्हा नव्याने भेटते माझी प्रिय सखी