रोज डोळ्यांतून वाती
आसवे लावून जाती
पाकळी घायाळ येथे
डोलती डौलात पाती
शेवटी येती कधी का
सोबतीला सांग नाती
ना जमा ना खर्च काही
मोकळी सारीच खाती
काल सांगावा मिळाला
तार आली आज हाती
--अदिती
(माघ शु.१ शके १९२९,
८ फेब्रु. २००८)
(हाही प्रयत्न फसलेला आहे हे वे सां न ल)