गौरव

" परत कधी चुकुन सुध्दा 'माणुस ' म्हणु नकोस,
अर्ज आहे समज
विनंती आहे म्हण
पण माणुस म्हणु नकोस."
असं म्हणताच मी---
तो चक्क हसला.
म्हणाला,
"घाबरलास?
का रे?"

मी म्हटलं,
"सगळ- सगळ होण सोप आहे इथे,
पण माणुस?
अ हं.
अरे माणुस म्हटला की अंगात माणुसकी हवीच!
ती कुठुन आणु?
ती concept च out-dated झाल्ये हल्ली
असलीच तर असते एखाद्याकडेच
ती सुध्दा 'लिमिटेड माणुसकी'.
नाही तर मग नाहीच
मग उपयोग काय माणुस असण्याचा?"

तो म्हणाला,
"अरे कोणी सांगितलं तुला हे?
जरा समोर बघ,
डोळे उघडे ठेऊन बघ.
आपल्या अंगावरच्या फाटक्या लक्तरात जखमींना लपेटणार्‍यांकडे काय होत दुसरं?
माणुसकीच ना?
पावसात अडकलेल्यांना बिस्किटं देणार्‍यांचा काय धर्म होता?
माणुसकी हाच ना?
खड्यात अडकलेल्या कोण कुठच्या प्रिंन्ससाठी प्रार्थना करणारे काय जपत होते
माणुसकीच ना?"

मी म्हटले,
"पण.. पण आरे...पण"

तो म्हणाला,
"पण पण काय करतोस?
जरा स्वत: वरती विश्वास ठेवुन बघ.
समोरच्यावरही विश्वास ठेवायला शिक.
बहरलेल्या बागेत थोडं तणं असणार
म्हणुन काही बागेच सौदर्य कमी होत नाही
साक्षात देवांनाही शाप आहेत
माणसाच काय सांगतोस!
स्वत: पासुन सुरवात कर्----
तू साद घालुन तर बघ,
दशदिशांतुन येईल प्रतिसाद.
अनुभुती घेऊन बघ."

मग पतर कधी चुकुन सुध्दा असं म्हणणार नाहीस,
कारण माणुस म्हणवुन घेण्यातच गौरव वाटेल तुला"