घर उरले दूर मागे
घन दिसते रान रान
श्वापदे आरोळती, पण
मज नाही मात्र भान १
पाखरे गत संचिताची
पंख झटकुनी उडाली
रिक्त काळेभोर उघडे
फक्त माथी आसमान २
वाट ही नवखीच होती
सोबती नव्हता कुणी
अंतरी कल्लोळ होता
उसनवारीचे अवसान ३
एकटा मी या इथे,
या निर्मनुष्य आरवी
कर्म हे माझे म्हणू, की
दैव हे दोलायमान? ४
~श्रीराम