ओलावा....

.

अगदी चिंब भिजल्या शिवाय
ओल जाणवतच नाही का?

आणि वर वर कोरड्या खोबणीत
झुळझुळता झरा नसेलच
अस पैजेवर सांगता येत का?

काही झरे जमिनी खालून ही
वर्षोन वर्ष वाहतातच ना?

कुठे जाणवतो तेव्हा त्यांचा ओलावा
म्हणून नसतोच अस असत का?

काही गोष्टी अशाच तर असतात....
:
:
असून नसल्या सारख्या!!
नसून असल्या सारख्या!!

स्वाती फडणीस ................. १०-०३-२००८