काळजीच घुसमट आभाळाची घुटमळ सर सर नयनी चित्ताचीच ओघळण
भय दाटले मनी ह्रदयी कंपणे झेलत ओठाचीच थरथर तरी सरीवर सर नयनी
नाभीपासुन चित्कार एक आत्म्याचा हुंकार नभी नाचते वीज आभास पिळवटुन
सरीवर सर .. सर सर नयनी
आभाळाचा रंग मनाचे पटल तरी दु:खातच भर अन सरीवर सर
उराची धडधड देहाची धडपड मनाचा कल्लोळ अन सरीवर सर
आशेचा भोंगळ आकाशाचे आक्रंदन ते व्यथेचे क्षितीज अन सरीवर सर
-------- गणेशा
निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरण
पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने होत असलेली दैनंदिन प्रगती पाहून यापुढे मनोगतासाठी निरंतर ऊर्ध्वश्रेणीकरणाचा अंगीकार करणे उचित दिसत आहे. त्याप्रमाणे आवश्यक ते बदल व्यवस्थेत केले जात आहेत. manogat.prashaasak@gmail.com ह्या पत्त्यावर आपल्या अडचणी व/वा सुचवणी विपत्राने कळवता येतील.