अन सरीवर सर...

काळजीच घुसमट
आभाळाची घुटमळ
सर सर नयनी
चित्ताचीच ओघळण

भय दाटले मनी
ह्रदयी कंपणे झेलत
ओठाचीच थरथर तरी
सरीवर सर नयनी

नाभीपासुन चित्कार
एक आत्म्याचा हुंकार
नभी नाचते वीज
आभास पिळवटुन

सरीवर सर ..
सर सर नयनी

  आभाळाचा रंग
मनाचे पटल
तरी दु:खातच भर
अन सरीवर सर

उराची धडधड
देहाची धडपड
मनाचा कल्लोळ
अन सरीवर सर

आशेचा भोंगळ
आकाशाचे आक्रंदन
ते व्यथेचे क्षितीज
अन सरीवर सर

     
                     -------- गणेशा