दिंडी चाललेली । असीमाच्या गावा
सीमेवरी ह्वावा । तुझा भास...
आपल्या गळ्याला । आपलाच फास
निखाऱ्यांची रास । पायाखाली..
आगीतही डोले । माझे रानफूल
वसंताची भूल । शिशिराला....
पापण्यांत जाळ । ओठांत चंदन
मनाचे क्रंदन । लपू गेले
फुटोनिया गेला । जन्माचा कातळ
उठले मोहोळ । पारावर ......
विभ्रम