आठवणींचा गाव

-----------------------------

॥  आठवणींचा गाव ॥

----------------------------

क्षणांची धावपळ । झऱ्याची खळखळ ॥

तांबुसलेली वाट । संध्येची पानगळ ॥१॥

कळीची हुरहुर । सखीची चाहूल ॥

वासराची खोड । गायीची ओढ ॥२॥

ओला ग्रीष्मवारा । ऊबदार श्रावणधारा ॥

संधिकाली मारवा । पिंपळाखाली गारवा ॥३॥

धुंद दाही दिशा । गंधवाही निशा ॥

रंगल्या गोष्टी अशा । ह्या हृदयीच त्या हृदयी ॥४॥

ओढ्याकाठी एकटा मी । देवळापाठी एकटा मी ॥

गळां दाटी पौर्णिमा अन । माझ्यासाठी एकटा मी ॥५॥