खूण

पाऊस भरूनि

अंधार दाटला

कसा हा फाटला

कसा आभाळाचा ||

वैफल्याचे डोही

वैफल्य तरंग

वैफल्यचि रंग

आता जाला ||

शुभ्र माळावरी

उडती पतंग

ते असे नि:संग

कसे झाले? ||

जाणीवा दाटल्या

ठिपक्यांत दोन

त्रिकोनाचा कोन

उसवला ||

पौर्णिमा उलटूनि

हीच आली वेळ

हाच तो खेळ

सावल्यांचा ||

काळ पुनःपुन्हा

घाली तेच कोडे

पायातले खोडे

कसे गळावे? ||

लोभस निळाई

जरी करडी जाहली

आनंदे न्हायली

खूण अंतरीची ||